टोमॅटोला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव
- By - Team Agricola
- Nov 14,2024
टोमॅटोला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव
सध्या बाजार समितीत टोमॅटोच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे. बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या टोमॅटोला सरासरी २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १४ नोव्हेंबर रोजी पुणे बाजार समिती टोमॅटोला १३०० रुपये भाव मिळाला आहे. याच बाजार समितीत कमीत कमी भाव ६०० ते जास्तीत जास्त भाव २००० रुपयांपर्यंत मिळाला आहे. या बाजार समितीत टोमॅटोची २०१० क्विंटल आवक झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी २००० रूपये भाव मिळत आहे. या बाजार समितीत कमीत कमी भाव २००० रुपये जास्तीत जास्त भाव २५०० रुपये मिळाला असून या बाजार समितीत १८५० क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी १७५० रुपये भाव मिळत आहे. या बाजार समिती टोमॅटोला कमीत कमी भाव १५०० रुपये जास्तीत जास्त भाव २००० रुपये मिळाला असुन या बाजार समिती टोमॅटोची आवक ६६८ क्विंटल झाली आहे. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये टोमॅटोची सर्वात कमी आवक झाली असून १५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. या बाजार समिती टोमॅटोला कमीत कमी दर १५०० रुपये जास्तीत जास्त २५०० हजार रुपये तर सरासरी दर हा २००० रुपये भाव मिळाला आहे.