new-img

नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 च प्रोत्साहन मिळणार- शरद पवार

शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार
नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 च प्रोत्साहन मिळणार- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महत्वपूर्ण घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत. आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचं  3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचं प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे पवार म्हणाले.