new-img

चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन ऊसाला ३७०० रुपयांची एकरकमी एफआरपी द्यावी- राजू शेट्टी

चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन ऊसाला ३७०० रुपयांची  एकरकमी एफआरपी द्यावी- राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23 वी ऊस परिषद जयसिंगपूरमध्ये पार पडली. यावेळी  चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन ऊसाला ३७०० रुपयांची  एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दिवाळीपुर्वी तातडीने २०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, असेही शेट्टी म्हणाले.