new-img

तुरीच्या दरात काहिशी सुधारणा, तुरीला मिळतोय १० हजार रूपये बाजारभाव

तुरीच्या दरात काहिशी सुधारणा, तुरीला मिळतोय १० हजार रूपये बाजारभाव

तुरीच्या बाजारात मागील काही दिवसांपासून चढउतार सुरू आहे. पण आता सणासुदीत तुरीच्या दरात काहिशी वाढ झालेली आहे. सध्या बाजारात तुरीला ९४०० ते १०  हजार रूपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २४ ऑक्टोबर २०२४ बाजारात तुरीला सरासरी १०२५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. अकोला बाजारसमितीत तुरीला ९२०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. अकोला बाजारात तुरीची आवक १३३ क्विंटल झालेली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर ७५०० ते जास्तीतजास्त दर १० हजार रूपये मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत तुरीची ६६० क्विंटल आवक झालेली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर १० हजार रूपये जास्तीतजास्त दर १०५०० रूपये मिळाला असुन बाजारसमितीत सरासरी दर १०२५० रूपये मिळाला आहे. धुळे बाजारसमितीत या दिवशी केवळ ३ क्विंटल तुरीची आवक झाली असुन दर ६५०० रूपये मिळाला आहे.

अकोला 
आवक-१३३ क्विंटल
कमीतकमी दर- ७५०० रू
जास्तीतजास्त दर- १०००० रू
सरासरी दर- ९२०० रू

अमरावती 
आवक- ६६० क्विंटल 
कमीतकमी दर- १०००० रू
जास्तीतजास्त दर- १०५०० रू
सरासरी दर- १०२५० रू

धुळे 
आवक- ०३ क्विंटल 
कमीतकमी दर- ६५०० रू
जास्तीतजास्त दर- ६५०० रू
सरासरीदर - ६५०० रू