MSP म्हणजे काय?
- By -
- Aug 25,2023
MSP म्हणजे काय? - MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत ही एक प्रणाली आहे. ही प्रणाली हमीभावाची आहे. हमीभाव प्रत्येक पिकांवर वेगवेगळ्या पध्दतीने लागू होतो. जर शेतकऱ्याच्या पिकाला बाजारात भाव कमी असेल, किंवा घसरण झाली असेल तर केंद्र सरकारने ठरवलेल्या हमीभावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करते. केंद्र सरकार ज्या किंमतीत शेतमाल खरेदी करतं, त्यालाच MSP म्हणतात. यामुळे शेतऱ्यांना दिलासा मिळतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. तर व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे मनमाने दर ठरवले जातात त्यावरही अंकुश येणार आहे.
MSP कोण ठरवतं? - भारत सरकारच्या कृषी मंत्रालय MSP ठरवतं. MSP प्रत्येक पिकांवर वेगवेळी लागू होते. तर एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असते. म्हणजे एक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दराने सरकार खरेदी करते त्याच दरात इतर राज्यातही खरेदी केली जाते. अशापध्दतीने सरकार 23 शेतमालांची खरेदी करते यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस आदी पिकांचा समावेश आहे.