सोयाबीनचा पेरा वाढला, दर किती मिळणार?
- By - Team Agricola
- Sep 10,2024
सोयाबीनचा पेरा वाढला, दर किती मिळणार?
शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. देशात सोयाबीन पेरा वाढल्याने यंदा सोयाबीनचे दर घसरू शकता. यावर्षी मध्य प्रदेश मध्ये सोयाबीनची पेरणी हे १०.५ लाख हेक्टर वर झालेली आहे. मागील वर्षी मध्य प्रदेश मध्ये सोयाबीनचे पेरणी ९.७ लाख हेक्टरवर केल्या गेली होती. राजस्थानमध्ये देखील सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राजस्थानमध्ये सोयाबीनची पेरणी १२.२ लाख हेक्टर वर झालेली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये १२ टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी राजस्थानमध्ये सोयाबीनची पेरणी १०.९ हेक्टरवर होती. महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी ही ८.२ लाख हेक्टर वर झालेली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पाच टक्क्याने अधिक आहे. मागील वर्षी हीच आकडेवारी ७.८ लाख हेक्टर वर होती. त्यामुळे यंदा पेरा वाढला म्हणजे दरात चढउतार होऊ शकतात.