new-img

तुरीला मिळतोय सरासरी १० हजार रुपये बाजारभाव

तुरीला मिळतोय सरासरी १० हजार रुपये बाजारभाव

गेल्या अनेक दिवसांपासून तुरीच्या दरात कायम चढउतार सुरू आहे. बाजारसमितीत तुरीला सरासरी दर हा १०००० रूपयांच्या वर भाव हे मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार १३ ऑगस्ट २०२४ रोजी बाजारसमितीत तुरीला सरासरी समाधानकारक असा बाजारभाव हा मिळत आहे. अमरावती बाजारसमितीत लाल तुरीला सरासरी दर हा १०७०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा १०५०० रूपये मिळाला आहे. जास्तीतजास्त भाव हा १०९०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत १०११ क्विंटल तुरीची आवक झालेली आहे. नागपूर बाजारसमितीत तुरीची आवक ही २०१ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ९५०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत १०८०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत सरासरी दर हा १०४७५ रूपये मिळाला आहे.
सध्या बाजारसमितीत तुरीला सरासरी दर हा १० हजार ते ११ हजार रूपयांच्या आसपास मिळाला आहे. बाजारसमितीतील तुरीच्या दरातील चढउतार कायम असणार आहे.