new-img

शरबती गव्हाला किती मिळतोय दर

शरबती गव्हाला किती मिळतोय दर 

बाजारसमितींमध्ये गव्हाला समाधानकारक दर हा मिळत आहे. बाजारसमितींमध्ये गव्हाची आवक ही वाढली असुन सर्वाधिक दर हा शरबती गव्हाला मिळतांना दिसुन येत आहे.

सध्या बाजारात गव्हाला सरासरी दर हा २ हजार ते ४ हजार रूपयांच्या दरम्यान मिळत आहे. शरबती गव्हाला ३० एप्रिल रोजी सर्वाधिक दर हा पुणे बाजारसमितीत मिळाला असुन या बाजारसमितीत सरासरी दर हा ५ हजार रुपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ४४०० ते जास्तीतजास्त दर हा ५६०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत शरबती गव्हाची आवक ही ४१६ क्विंटल झाली आहे. 

त्यानंतर नागपुर बाजारसमितीत शरबती गव्हाला सरासरी बाजारभाव हा ३४०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत १००० क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. सोलापूर बाजारसमितीत शरबती गव्हाला सरासरी भाव हा ३ हजार रुपये मिळाला आहे. कल्याण बाजारसमितीत २८०० रूपये भाव हा मिळाला आहे.