बाजारात कांद्याला किती मिळतोय दर
- By - Team Agricola
- Apr 30,2024
बाजारात कांद्याला किती मिळतोय दर
गेल्या अनेक दिवसांपासुन कांद्याचे भाव हे घसरले आहेत. कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. कांद्याला हमीभावपेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा बाजारात अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादकता कमी झालीच शिवाय पाऊस आणि गारपीटीनेही कांद्याचं नुकसान होतंय. सरकारने कांदा निर्यातबंदी करून जवळपास पाच महिने होत आलेत आणि यामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नाही. कांद्याला सरासरी दर हा आजही १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार ३० एप्रिल रोजी सरासरी कांद्याला दर हा ७०० ते १५०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. सर्वात कमी दर हा छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत सरासरी ७५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ८२० क्विंटल कांद्याची आवक ही झाली आहे. पुणे-पिंपरी बाजारसमितीत कांद्याला सरासरी १५०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत आवक ही ५ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी जास्तीतजास्त दर हा १५०० रूपये मिळाला आहे.
एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे कांदा साठवुन ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दरात शेतकरी विकत आहेत.