new-img

राजापुरी हळदीला १७ हजार ८०० रूपयांचा दर

राजापुरी हळदीला १७ हजार ८०० रूपयांचा दर 

यंदा हळदीला बाजारसमितीत चांगला दर मिळत आहे. बाजारात राजापुरी हळदीला सर्वाधिक दर मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २९ एप्रिल रोजी राजापुरी हळदीला १७ हजार ८०० रूपयांचा दर मिळत आहे. सांगली बाजारसमितीत हळदीला कमीतकमी दर हा १४ हजार ते जास्तीत जास्त दर हा १८ हजारांपर्यंत मिळाला आहे. या बाजारसमितीत राजापुरी हळदीची आवक ही ७२५३ क्विंटल झाली आहे. लोहा बाजारसमितीत १४ हजार ६०० ते पुर्णा बाजारसमितीत १४ हजार ३२० रूपये दर मिळाला आहे. 

सध्या बाजारात हळदीच्या दरात चढउतार सुरू आहे. बाजारअभ्यासकांच्या मते हळदीचे दर अजुन तेजी येण्याची शक्यता आहे.