कांद्याचा आजचा बाजारभाव, बाजारसमितीत किती मिळतोय दर
- By - Team Agricola
- Apr 26,2024
कांद्याचा आजचा बाजारभाव, बाजारसमितीत किती मिळतोय दर
कांदा दरात अनेक दिवसांपासुन घसरण ही सुरूच आहे. कांदा दरात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दुष्काळामुळ यंदा कांदा उत्पादन हे १६ टक्क्यांनी घटल आहे. उत्पादनात घट झाली असुन देखील कांदा दरात घसरण मात्र सुरूच आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार कांद्याला पुणे-मोशी बाजारसमितीत बाजारभाव हा ८५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ५०० ते जास्तीत जास्त दर हा १२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ४०८ क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे. पुणे-पिंपरी बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा १२५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. खेड-चाकण बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा १२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत कांद्याची आवक ही १०० क्विंटल झाली आहे.
बाजारात कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. त्यामुळे कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असुन कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.