new-img

तुरीला या बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वाधिक भाव

तुरीला या बाजारसमितीत क्विंटलमागे सर्वाधिक भाव  

गेल्या अनेक दिवसांपासुन बाजारसमितीत तुरीला समाधानकारक दर मिळत आहे.  तुरीला १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. आता तुरीच्या दरात क्विंटलमागे २०० रूपयांपर्यंत घसरण होत आहे. आज २३ एप्रिल रोजी तुरीला सर्वाधिक दर हा कारंजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत सरासरी दर हा ११ हजार ३०५ रूपयांपर्यंत मिळाला आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार कारंजा बाजारसमितीत ८०० क्विंटल तुरीची आवक झाली आहे. या बाजारसमितीत जास्तीत जास्त दर हा १२ हजार १०५ रूपये मिळाला. त्यानंतर पैठण बाजारसमितीत सरासरी दर हा १० हजार ८७६ रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ६ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. तुरीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. तुरीला बाजारसमितीत सरासरी ११ हजारांपर्यंत दर मिळत आहे.