हळदीला किती मिळतोय दर
- By - Team Agricola
- Apr 23,2024
हळदीला किती मिळतोय दर
यंदा बाजारसमितीत हळदीला समाधानकारक दर मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे. हळदीला सध्या बाजारसमितीत सरासरी दर हा १३ हजार ते २२ हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज २३ एप्रिल रोजी मुंबई बाजारसमितीत लोकल हळदीला सरासरी दर हा १९ हजार रुपये मिळाला. या बाजारसमितीत हळदीला कमीतकमी दर हा १६ हजार ते जास्तीत जास्त दर हा २२ हजार रुपये मिळाला असुन हळदीची आवक ही २०६ क्विंटल झाली आहे.
यंदा राजापुरी हळदीला सर्वाधिक दर हा मिळत आहे. त्यासोबतच लोकल, हायब्रीड या देखील हळदीची बाजारात आवक होत असुन यंदा समाधानकारक दर मिळाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.