new-img

लाल मिरचीच्या दरात घसरण

लाल मिरचीच्या दरात घसरण 

बाजारसमितींमध्ये लाल मिरचीला सध्या सरासरी दर हा ५०० ते १७,००० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळत आहे. मिरचीच्या गुणवत्तेप्रमाणे व व्हरायटीप्रमाणे मिरचीला दर मिळत असला तरी देखील लाल मिरचीला मागील वर्षी उच्चांकी दर हा मिळाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी दर मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २२ एप्रिल रोजी लाल मिरचीला सरासरी दर हा सोलापूर बाजारसमितीत ७ हजार रुपये मिळाला आहे. या बाजारसमितीत २८५ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ११०० ते जास्तीत दर हा ११८०० रुपये मिळाला आहे. 

बाजारसमितींमध्ये सध्या लोकल, हायब्रीड, शंखेश्वरी, ओली, ब्याडगी, ज्वाला, लवंगी, पांडी, काश्‍मिरी या जातीच्या मिरची विक्रीसाठी येत आहे. यावर्षी उत्पन्न जास्त असल्यामुळे आणि आवक जास्त येत असल्यामुळे मिरचीला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.