new-img

लाल मिरचीच्या दरात घसरण

लाल मिरचीच्या दरात घसरण 

मागील काही महिन्यांपासुन मिरचीच्या दरात वाढ झाली होती. आता बाजाारसमितींमध्ये मिरचीची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने लाल मिरचीच्या दरात काहीशी नरमाई आली आहे. 

यंदा अवकाळी पावसाचा फटका लाल मिरची उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे यंदा लाल मिरची उत्पादनात घट झाली असली तरी नवी मिरची बाजारात येत असल्याने आवक ही वाढत आहे. 

महाराष्ट्र पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार लाल मिरचीला आज १८ एप्रिल रोजी जालना कृषी उत्पन्न बाजारसमितीत सरासरी दर हा ६००० रूपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत ९६ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली असुन मिरचीला कमीतकमी दर हा २५०० ते जास्तीत जास्त दर हा १८००० रूपयांपर्यंत मिळत आहे.
लाल मिरचीला गुणवत्तेप्रमाणे दर मिळत असला तरी दरात काहीशी घसरण झाल्याच पाहायला मिळत आहे.