सोयाबीनला मिळतोय हमीभावादरम्यान दर
- By - Team Agricola
- Apr 17,2024
सोयाबीनला मिळतोय हमीभावादरम्यान दर
सोयाबीन दरात सतत चढउतार सुरू आहे. बाजारसमितींमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी किंवा त्यादरम्यान दर मिळत आहे. यंदा दुष्काळ आणि अवकाळीमुळे देशातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास ३० ते ४० टक्कयांची घट झाली आहे.
सध्या सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील काही दिवसांपासुन दर हा ४४०० ते ४५०० दरम्यान मिळत आहे. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमी न सोयाबीनची विक्री होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने सोयाबीनला ४६०० रूपये MSP जाहीर केलीय. परंतु सोयाबीनची खरेदी-विक्री एमएसपी पेक्षा कमी दराने होत आहे. सोयाबीनला सध्या सरासरी दर हा ४१०० ते ४५०० रूपये भाव मिळत आहे. थोडक्यात सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार सोयाबीनला दर हा १६ एप्रिल रोजी लासलगाव-विंचुर बाजारसमितीत ४५०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत सोयाबीनची आवक ही ९१२ क्विंटल झाली आहे. सोयाबीनच्या भावात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.