कापसाचे दर वाढणार का? बाजारसमितीत किती मिळतोय भाव
- By - Team Agricola
- Apr 13,2024
कापसाचे दर वाढणार का? बाजारसमितीत किती मिळतोय भाव
कांदा आणि सोयाबीनच्या घसरत्या भावाने शेतकरी त्रस्त झाले आहे. तुरीच्या भावाने शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. तर एकीकडे कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासुन चढउतार सुरूच आहेत. सध्या कापसाला सरासरी दर हा ७ हजार ते ७ हजार ४०० रूपये मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अमरावती बाजारसमितीत कापसाला ७४०० रूपयांपर्यंत दर मिळत आहे. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत कापसाला सरासरी दर हा ७४०० रूपये मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मागील काही आठवड्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाली. भारत, चीन आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले. त्यामुळे मागणी वाढणार आहे. अभ्यासकांच्या मते हे दर वाढण्याची शक्यता आहे. हे दर एप्रिल च्या शेवटी किंवा मे च्या सुरवातीच्या आठवड्यात वाढतील. कापसाचा जास्तीत जास्त भाव हा ८००० ते ८५०० रूपये मिळु शकतो. कापसाचे भाव सध्याच्या पातळीवरून आणखी 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.