तुरीला मिळतोय चांगला दर, कोणत्या बाजारसमितीत किती मिळतोय भाव?
- By - Team Agricola
- Apr 06,2024
तुरीला मिळतोय चांगला दर, कोणत्या बाजारसमितीत किती मिळतोय भाव?
बाजारसमित्यांमध्ये तुरीला समाधानकारक दर मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी आनंदात आहे. तर सध्या तुरीला सरासरी
८००० ते १०००० रूपये दर मिळत आहे. तर काही बाजारसमित्यांमध्ये तुरीला सध्या १० हजारांच्या वर ही दर गेले आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज ६ एप्रिल रोजी तुरीला अमरावती बाजारसमितीत १११०२ रूपये दर
मिळाला आहे. तर या बाजारसमितीत आज २७८८ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. तुरीला कमीतकमी दर हा १०६०० ते जास्तीत दर हा
११६०५ रूपये मिळाला आहे. नागपूर बाजरसमितीत लाल तुरीला सरासरी दर हा १०८४४ रूपये दर मिळाला आहे. तर या वाजारसमितीत
कमीतकमी दर हा ९५०० ते जास्तीत दर हा ११२९२ रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीमध्ये २५३५ क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
तुरीला चांगले दर मिळत असल्याने तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.