कांद्याला आज काय मिळाला भाव
- By - Team Agricola
- Apr 04,2024
कांद्याला आज काय मिळाला भाव
कांदा दरात सतत घसरण सुरू होत आहे. मागील दोन दिवसांपासुन कांद्याची आवक घटली आहे. सध्या कांद्याला सरासरी दर हा ८०० ते १४०० रूपये मिळत आहे.
४ एप्रिल आज महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पुणे-पिंपरी बाजारसमितीत ९क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला सरासरी दर हा १३५० रूपये मिळत आहे. तर कमीत कमी दर हा १००० ते जास्तीत दर हा १७०० रूपये मिळत आहे. तर आज पुणे-मोशी बाजारसमितीत ७२२ क्विंटल कांद्याची आवक झाली असुन कांद्याला कमीत कमी दर हा ८०० ते जास्तीत दर १३०० रूपये मिळत आहे. तर सरासरी दर १०५० रूपये मिळत आहे. सध्या कांद्याची आवक घटली आहे. कांद्याला १४०० रूपयांपर्यंत दर मिळत असुन कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.