कापसाला मिळतोय हमीभावापेक्षाही कमी दर
- By - Team Agricola
- Apr 01,2024
कापसाला मिळतोय हमीभावापेक्षाही कमी दर
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. कापसाची आवक घटली आहे तरी कापसाला यंदा कमी दर मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिकाला कमी दर मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहे.
तर आज १ एप्रिल रोजी देउळगाव राजा बाजारसमितीत कापसाला सरासरी ७७५० रूपये दर मिळाला असुन या बाजारसमितीत कापसाची ३०० क्विंटल आवक झाली तर कमीत कमी दर हा ७००० तर जास्तीत दर हा ८००५ रूपये मिळाला.अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत ३५ क्विंटल कापसाची आवक झाली, तर कापसाला सरासरी दर हा ७४२५ रूपये मिळाला आहे. कापसाला कमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.