कापसाची आवक कमी, भाव वाढणार?
- By - Team Agricola
- Mar 29,2024
कापसाची आवक कमी, भाव वाढणार?
बाजारात सध्या कापसाच्या भावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे आणि कापसाची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांकडे कापूस काही प्रमाणात शिल्लक असल्याने आवक कमी झाली. ही कापसाची आवक अजुन कमी होणार असुन यामुळे कापूस भावात सुधारणा येऊ शकते.
अनेक बाजारसमितींमध्ये कापसाच्या दरात १०० रूपयांपर्यंत सुधारणा दिसून येत आहे. मध्यम स्टेपलच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे.सध्या कापसाला सरासरी दर हा ६५०० ते ७७०० रूपयांपर्यंत मिळत आहे. कापसाच्या गुणवत्तेनुसार कापसाला भाव मिळत आहे. त्यामुळे पुढील काळात कापसाची आवक कमी झाली की दरात अजुन सुधारणा होणार आहे. एप्रिल , मे मध्ये कापसाचे भाव वाढतील अस अंदाज कृषी अभ्यासक व्यक्त करत आहे.