कापूस दराने गाठली निच्चांकी पातळी, प्रतिक्विंटल 5 हजारांचा दर
- By -
- Feb 05,2024
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी (दि. 1) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. पण त्याच दिवशी कापसाच्या दराने यंदाच्या हंगामातील निच्चांकी गाठली. गुरुवारी (दि. 1) नेर परसोपंत बाजार समितीमध्ये कापसाला केवळ 5 हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.
लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक बाजार समित्यांमध्ये झाली होती. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वांत कमी दर हा नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 5 हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये सर्वाधिक 6 हजार 976 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. पुलगाव, हिंगणघाट, सिंदी सेलू, देऊळगाव राजा, उमरखेड बाजार समित्यांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. तर नेर परसोपंत आणि हिंगणा बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी 26 आणि 32 क्विंटल कापसाची आवक झाली.