new-img

श्रीगोंदा बाजार समितीत दीड वर्षांनंतर कांदा खरेदी सुरू!

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षापासून बंद असलेली कांदा खरेदी पुन्हा एकदा सोमवार, दि. 25 डिसेंबर पासून सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी 2700 गोणी गुलाबी कांद्याची विक्रमी आवक देखील झाली. या वेळी 1800 ते 2000 रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.

मागील दीड दोन वर्षापासून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद असलेला कांदा लिलाव बाजार समितीचे नवीन सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर तसेच संचालक मंडळाच्या प्रयत्नाने 25 डिसेंबरपासून सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होत असल्याची माहिती संचालक अजित जामदार यांनी दिली.