बाजार समितीत लाल मिरचीची विक्रमी आवक
- By -
- Oct 30,2023
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी 225 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली होती. यावर्षी हा आकडा 3 लाख क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात बाजार समितीत जवळपास 30 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली.
यावर्षी तिला पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. तसेच मिरचीला बाजार भावही चांगला मिळत असल्याने नंदुरबार सोबतच शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशमधील शेतकरी मिरची खरेदीसाठी नंदुरबार बाजार समितीला प्राधान्य देत आहे.