new-img

ब्रेकिंग ! पुणे बाजार समिती ची होणार तपासणी

पुणे बाजार समितीतील गैरकारभारासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्चितीची बजावलेली नोटीस पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी वैध ठरवली आहे. याबरोबरच पुढील 60 दिवसांत चौकशी पूर्ण करून कारवाई करण्याचे आदेश मंत्री सत्तार यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्यमान सभापतींसह चार संचालकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर तब्बल 20 वर्षे प्रशासकराज होते. मे 2023 मध्ये निवडणूक होऊन बाजार समितीवर संचालक मंडळ निवडून आले होते, पण सध्याच्या संचालक मंडळामधील काही संचालकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे सहा महिन्यांतच पुन्हा कारवाईचे शुक्लकाष्ठ मागे लागले आहे.