new-img

महाराष्ट्र अंडी समन्वय स्थापनेची मागणी समिती

महाराष्ट्रातील लेअर आणि बॉयलर पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य डॉ. पठाण यांनी महाराष्ट्र अंडी समन्वय समिती असावी, अशी मागणी केली आहे. नॅशनल एग्ज कॉर्डिनेशन समितीच्या धर्तीवर महाराष्ट्र एग्ज कॉर्डिनेशन समितीची स्थापना करावी. अंडी उत्पादकांचे हे फेडरेशन राज्यातील अंडी बाजार, दरासह इतर बाबींवर नियंत्रण ठेवेल. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करेल. त्यामुळे अशा फेडरेशनच्या स्थापनेला मान्यता मिळावी, अशी मागणी पोल्ट्री व्यवसायिकांची आहे.