बाजार समितीमुळे शेतकऱ्यांना होणारे मुख्य फायदे
- By -
- Sep 21,2023
कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे शेतकऱ्यांना होणारे 3 मुख्य फायदे
1) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल बोली लावून विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला जो जास्त बोली लावेल, त्या व्यापाऱ्याला माल विकण्याचे स्वतंत्र असते.
2) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी दुकाने असतात, त्याच्या दुकानांकडे परवाना असतो. त्यामुळे शेतीमाल घेतला आणि व्यापारी गायब झाला आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडाले, असे प्रकार बाजार समितीमध्ये होत नाही.
3) बाजार समितीमध्ये अडत्या हा शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात मदत करत असतो. माल आणणे, वजन करणे वा माल उतरवणे इत्यादी फायदा शेतकऱ्यांना होतो. फसवणूक होऊ नये म्हणून शेतमालाची बोली लावली जाते, त्याचे लिखित स्वरूपात पुरावे ठेवले जातात.